संभाजीनगरात ठाकरे गटात मोठी फूट, व्हीप डावलून सदस्य थेट भुमरेंच्या भेटीला

Foto


 छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीत  छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात मोठी फुट पडली असून या संदर्भात कालिला व्हीप झुगारण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान  निवडणुकीपासून दूर राहण्याचा व्हीप अंबादास दानवेंकडून  बजावण्यात आला होता, मात्र कृष्णा डोंणगावकर , निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी अर्जही दाखल केला आहे, कृष्णा डोंणगावकर शिवसेना शिंदे गटाच्या खासदार संदिपान भुमरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत, भाजपाशी युती होत नसेत तर शिवसेनेने मदत करावी असे आवाहन कृष्णा डोंणगावकर यांनी केले आहे, त्यामुळे आता त्यांनी पक्षाचा व्हीप जुगारला आहे अशी माहिती समोर आली आहे, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकीय वर्तुळात मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी निवडणूक आज होत आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोणालाही मतदान करू नये असा व्हीप जारी केला होता. मात्र तो व्हीप जुगारून कृष्णा डोंणगावकर  यांनी अर्ज खरेदी केला आहे, आणि आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी कृष्णा डोंणगावकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्याकडे गेले होते, तुमचा आणि भाजपच पटत नाही तर तुम्ही गैरहजर न राहता तुम्ही मला मतदान करा अशा प्रकारचे कृष्णा डोंणगावकर यांनी आवाहन केले आहे.